
वाळुज महानगर, (ता.20) – मुथूट एक्झिमने महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे नवीन गोल्ड पॉइंट सेंटर सुरू केले असून या सेंटर च्या माध्यमातून आपला व्यवसाय वृध्दिंगत करण्याच्या दिशेने मजबुत पाऊल टाकले आहे. १३८ वर्ष जुना व्यवसाय समूह असलेल्या मुथूट पप्पाचन ग्रुपची (मुथूट ब्लू म्हणूनही ओळखली जाते) मौल्यवान धातूची शाखा म्हणजेच मुथूट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेडने छत्रपती संभाजीनगर मध्ये नवीन मुथूट गोल्ड पॉइंट सेंटरचे दुकान क्र. 3, कुबेर एव्हेन्यू बी, हॉटेल अतिथी समोर, सेव्हन हिल्स, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर येथे मोक्याच्या ठिकाणी 19 ऑगस्ट पासून ग्राहकांच्या सेवेत रुजू झाले आहे. 
मुथूट एक्झिमचे हे भारतातील ५८ वे गोल्ड पॉइंट सेंटर आहे आणि फिरत्या गाडीसह महाराष्ट्रातील हे सहावे केंद्र आहे. छत्रपती संभाजीनगर येथे या गोल्ड पॉइंट सेंटरचा शुभारंभ झाल्यामुळे स्थानिक लोकांच्या आर्थिक जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणेल. यामुळे त्यांना त्यांच्या सोन्याच्या वस्तू विकण्याची सुविधा तर मिळेलच, याशिवाय या विश्वासार्ह व पारदर्शक केंद्राद्वारे वित्तीय सेवा अधिक सुलभ होतील. मुथूट एक्झिमचे हे गोल्ड पॉइंट सेंटर पारदर्शकता, ग्राहकांचा विश्वास जपणे, बांधिलकी आणि त्यांच्या वचनबद्धतेसाठी प्रसिद्ध आहेत. या केंद्रांवर, ग्राहक त्यांच्या जुन्या आणि वापरलेल्या सोन्याच्या वस्तू वाजवी आणि अचूक मूल्यमापनाच्या आश्वासनासह विकू शकतात. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जाते, ज्यामुळे ग्राहकांना प्रत्यक्ष मूल्यांकन पाहता येते. या सेंटर मध्ये IMPS, NEFT किंवा RTGS सारख्या सुविधांच्या माध्यमातून मोठ्या रकमेचे पेमेंट करण्याची सुविधा आहे. तर दहा हजार रुपयांपर्यंतच्या सोन्यासाठी झटपट रोख पेमेंटची सोय आहे. ज्यामुळे ग्राहकांना अखंडित आणि विश्वासार्ह व्यवहाराचा अनुभव मिळतो.
मुथूट पप्पाचन ग्रुपचे कार्यकारी संचालक आणि मुथूट एक्झिमचे व्यवस्थापकीय संचालक थॉमस मुथूट यांच्या हस्ते संभाजीनगर या सेंटरचा शुभारंभ 14 ऑगस्ट रोजी उत्साहात संपन्न झाला. या उद्घघाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यवस्थापकीय संचालक थॉमस मुथुट म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये गोल्ड पॉइंट सेंटरचे उद्घघाटन करणे म्हणजे भारतात एक मजबूत आणि पारदर्शक सोन्याची पुनर्वापर करणारी यंत्रणा निर्माण करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाच्या पूर्णतेसाठी टाकलेले आणखी एक पाऊल आहे. या उपक्रमाद्वारे, आम्ही ग्राहकांना त्यांच्या वापरात नसलेले सोने विकून पैसे कमविण्याचा एक सुरक्षित, वैज्ञानिक आणि शाश्वत मार्ग प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यासोबत देशाच्या चक्रीय अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देतो. महाराष्ट्र आमच्यासाठी नेहमीच एक महत्त्वाची बाजारपेठ राहिली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की हे केंद्र विश्वास, सचोटी आणि उत्कृष्टरीत्या समुदायाची सेवा करेल.अशी ग्वाही थॉमस यांनी यावेळी दिली. याप्रसंगी उपस्थित मुथूट एक्झिमचे सीईओ केयुर शाह म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये आमच्या गोल्ड पॉइंट सेंटरचे उद्घघाटन म्हणजे महाराष्ट्रात आमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यास हातभार लावत असून ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी आमची वचनबद्धता पुन्हा एकदा स्पष्ट करत आहे. आमचे वचन आधीपासून तेच आहे की आम्ही सेवा देत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला उच्च दर्जाची पारदर्शकता, वाजवी मूल्य आणि सोने विक्रीचा सुरक्षित अनुभव प्रदान करणे. मुथूट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड (एमईपीएल) मौल्यवान धातूंच्या बाजारपेठेत नाविन्यपूर्णता आणण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. भारतात सोन्याचे पुनर्वापर केंद्र सुरू करणारी पहिली संघटित कंपनी म्हणून, एमईपीएलने उद्योग क्षेत्रात सातत्याने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. २०१५ मध्ये कोइम्बतूरमध्ये पहिले गोल्ड पॉइंट सेंटर सुरू झाल्यापासून, कंपनीने मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, एर्नाकुलम, त्रिवेंद्रम, दिल्ली एनसीआर, कोलकाता, हैदराबाद, हुबळी, नागपूर, बारासात, तिरुनेलवेली, गुंटूर, वारंगल, दावणगेरे, भुवनेश्वर, कलबुर्गी, त्रिशूर, लखनऊ, मोहाली, वेल्लोर, फरीदाबाद, कोझिकोड, त्रिची, बेलागवी, सेरामपूर, मथुरा, सिकंदराबाद, काकीनाडा आणि आता छत्रपती संभाजीनगर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये विस्तार केला आहे. हे सर्व सेंटर सातत्याने ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्जाची गुणवत्तापूर्ण उत्पादने देत आहे.
