March 23, 2026


तुर्काबाद, प्रतिनिधी (दि.6) – खरीप हंगामातील मुग पिकाचे उच्चांकी (विक्रमी) उत्पादन घेतल्याबद्दल महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने तुर्काबाद (खराडी) येथील शेषराव भाऊसाहेब पाटेकर या प्रगतीशील शेतकऱ्यांना जिल्ह्यातील तृतीय क्रमांकाचे सन्मानपत्र देऊन पाटेकर यांचा सत्कार करण्यात आला.

शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. त्यात उच्चांकी उत्पादन या सन्मानपत्राचा समावेश आहे. खरीप व रब्बी असे मुख्यत्वे शेतीचे दोन हंगाम असतात. यातील खरीप हंगामातील मूग या पिकाचे तुर्काबाद (खराडी) येथील शेषराव भाऊसाहेब पाटेकर या प्रगतीशील शेतकऱ्यांनी हेक्टरी 11.11 असे उच्चांकी (विक्रमी) उत्पादन घेऊन सर्वसाधारण गटात जिल्हास्तरीय तृतीय मिळवला.

या पुरस्काराबद्दल शेषराव पाटेकर यांचे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन पाटकर यांचा सन्मान करण्यात आला. यामुळे पाटेकर यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *