वाळूजमहानगर, (ता.23) – भरधाव जाणारी मिनी बस व दुचाकी यांच्यात धडक झाल्याने दुचाकी वरील एका महिलेचा सोमवारी (ता.23) रोजी उपचारादरम्यान घाटीत मृत्यु झाला. तर या अपघातात गंभीर जखमी झालेला मयत महिलेचा पती व चार वर्षाच्या चिमुकलीलीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
सासेगाव, ता.कन्नड येथील सुनील सुधाकर घुगे (27) हे रविवारी (ता.22) दुपारी 2 वाजेच्या सुमारास पत्नी मोनिका (24) घुगे व चिमुकली मुलगी गौरी (४) यांच्यासह दुचाकी (एम.एच.20,एफ.आर.0573) वर बसून सासेगाव येथुन वडगावला नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होते. सोलापुर-धुळे महामार्गावरुन वडगावकडे जात असतांना सांयकाळी 4 वाजेच्या सुमारास साजापूर चौफुलीजवळ पाठीमागुन भरधाव येणार्या मिनी बस (एम.एच.03 सी.व्ही.- 7264)च्या चालकाने सुनील घुगे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील सुनील घुगे, मोनिका घुगे व गौरी घुगे हे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले होते. या अपघाताची माहिती मिळताच ज्ञानेश्वर दिघोळे व सुधाकर घुगे यांनी जखमी तिघांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान सोमवारी (ता.23) सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास मोनिका घुगे यांचा मृत्यु झाला. तर गंभीर जखमी सुनील घुगे व गौरी घुगे या दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ.सुरेश तारव हे करीत आहेत.
