
वाळूजमहानगर, (ता.25)) – ग्रामपंचायत पाटोदा येथे माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत 1 हजार नारळाचे वृक्ष लागवड शुक्रवारी (ता.21) रोजी करण्यात आली. तसेच ग्रामपंचायतीचा कर भरणाऱ्या प्रत्येक खातेदाराला शेतात लागवड करण्यासाठी प्रत्येकी 2 नारळाची रोपे वाटप करण्यात आली. 
यावेळी पाटोदा गावात मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील भोकरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं) ओमप्रकाश रामावत, गटविकास अधिकारी ढोकणे यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. या प्रसंगी सरपंच जयश्री दिवेकर उपसरपंच कपिंद्र पेरे, ग्रामविकास अधिकारी पी एस पाटील, ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई पेरे, पूनम गाडेकर, मीरा जाधव, बेबीबाई पेरे, शामल थटवले, सुनिता पेरे, छाया पवार, लक्ष्मण मातकर यांच्यासह गांवातील दत्तू पेरे, निलेश पेरे, सिद्धेश्वर पेरे, रामेश्वर फांदाडे, नितेश मुचक, निवृत्ती पेरे, योगेश पेरे व समस्त गांवकरी उपस्थित होते.
