February 5, 2026


वाळूज महानगर (ता.10) – रस्त्याने चालणाऱ्या एका 42 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 1 लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने हिसकावून पोबारा केला. ही घटना बुधवारी 10 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास बजाजनगरमधील जय भवानी चौकात घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बजाजनगर येथील अर्चना अरुण वडाळकर ही 42 वर्षीय विवाहित महिला बुधवारी 10 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास रस्त्याने जात होती. ती बजाजनगर येथील जय भवानी चौकाजवळ येताच अचानक दुचाकीवरून दोन अज्ञात चोरटे आले. त्यांनी तिच्या गळ्यातील 1 लाख रुपये किमतीचे सुमारे 20 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून सुसाट निघून गेले. या घटनेनंतर महिलेसह तिच्या नातेवाईकांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेली घटना सांगितली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेज खंगाळत आहे. या घटनेसंदर्भात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
————————

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *