वाळूजमहानगर, (ता.17) -भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा ग्रामीण व शहर कार्यकारिणीच्या वतीने वाळुज येथील भारत लॉन्सयेथे भव्य संक्रांत सम्मेलनाच्या आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची उपस्थिती लक्षणीय होती.
यावेळी मार्गदर्शन करताना वाघ यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष पुष्पा काळे यांनी केले. त्यावेळी व्यासपीठावरून प्रदेश सरचिटणीस सविता कुलकर्णी, माजी महापौर लता दलाल, प्रदेश सरचिटणीस रेखा कुलकर्णी, मनीषा भन्साली, अमृता पालोदकर, अंजली वाघ, ऐश्वर्या गाडेकर, कल्पना पवार, रेखा नंदुरकर, राणी सोनवणे, अश्विनी लखमले आदी महिला पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.
या प्रसंगी महिलांनी ज्योती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात भाजपा महिला मोर्चा मध्ये प्रवेश केला. त्यात फ्रेंड्स ऑफ बीजेपी या उपक्रमांतर्गत प्रवीण शिंगरे, पंकज शिंगरे, शिंगरे परिवार व मनोज कासलीवाल, कमल कासलिवाल,गंगवाल परिवार ,पाटणी परिवार ,अग्रवाल परिवार यांच्या समवेत कुटुंबांना भेटी देऊन चर्चा केली. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते अविनाश गायकवाड ,श्रीरंग जोशी, प्रशांत ठाकरे, उमेश गंगवाल, सिराज पटेल, बाबासाहेब शिंदे , मोल शिंदे ,रामेश्वर मालुसरे, योगेश चव्हाण, हनीफ पटेल, नामदेव इले, राजेंद्र राजपूत, वंदना पवार, सुवर्णा गायकवाड, जय माला गोसावी, कविता साळवे, अलका नळे, ललिता खाजेकर, सीमा धोपटे, हेमलता सोमवंशी, द्रोपदा मोरे, मंगल टाके, सिंधू ढापसे, कल्पना घोरपडे, शाईन शेख,मंगल काळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगा ताठे यांनी तर आभार ज्योती अविनाश गायकवाड यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
