
वाळूजमहानगर, (ता.11) – महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी शासकीय योजना राबविण्यात येतात. त्यामुळे महिलांची प्रगती वेगाने होत आहे. महिलांच्या या प्रगतीवरच देशाची प्रगती अवलंबून आहे. असे मत ग्रामगीता व महिला सक्षमीकरण अभ्यासक तुषार बरगट यांनी बजाजनगर येथे व्यक्त केले.
बजाजनगर येथील श्री गुरुदेव सेवाश्रम व ग्रामगीता अध्ययन केंद्रात महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी (ता.9) रोजी महिला मेळावा घेरण्यात आला होता. प्रथम राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या प्रतिमास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य रेखा नांदुरकर, ग्रामगीता अभ्यासक तुषार बरगट, अरुणा प्रधान, प्रा. सुवर्णा बरगट, श्री गुरुदेव सेवा मंडळ बजाजनगरच्या अध्यक्षा रेखा हिंगणकर यांची उपस्थिती होती. या मेळाव्यात तुषार बरगट यांनी महिलोन्नती व महिला सक्षमीकरण या विषयी मार्गदर्शन केले. या मेळाव्यास वंदना मुटकरे, वनिता देशकर, पुनम निंबुळकर, उषा टिकम, गीता बोरकर, मनोरमा मानकर, ममता पळसकर, मालती बुले, श्रीलेखा गवळी, स्नेहा मुंडले, सरला जाधव, वैशाली गवई, अपर्णा मंगळे, रजनी ठाकरे, किरण वझळे, अर्चना टिळेकर, वंदना बुले , सोनाली देशमुख, विद्या मतकरी, वनिता वडोदकर, वनिता बोकुळे, सुनीता करताळे, दिपाली गिराटे, सपना कांबळे या महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गुरुदेव सेवा मंडळ, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज भजन मंडळ, श्री गुरुदेव महिला भजनी मंडळ, श्री गुरुदेव युवा मंच वाळूजमहानगरचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
