March 23, 2026

 


वाळुज महानगर, (ता.26) -लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ वाळूज येथे ढोल ताशाच्या गजरात व फटाक्याच्या आतिशबाजित प्रचारफेरी काढून गुरुवारी (ता.25) रोजी जाहीर सभा घेण्यात आली.

प्रथम महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचे वाळुज येथे आगमन होताच मुख्य महामार्गावर फटाके फोडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर जीवनलाल पाटणी प्रवेशद्वारापासून प्रचार रॅली सुरू झाली. गणपती मंदिर, शिवस्मारक मार्गे प्रचार रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान मुकेश शेठ बोरा यांचे घरासमोर बोहरा परिवाराच्या वतीने चंद्रकांत खैरे यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही प्रचार रॅली जामा मस्जिद मार्गे मनीषानगर, जैन मंदिर मार्गे जीवनलाल पाटणी प्रवेशद्वाराजवळ रॅलीची सांगता होऊन तेथेच सभा घेण्यात आली.

या प्रचार सभेत उमेदवार चंद्रकांत खैरे, उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास चव्हाण, काँग्रेसचे विजय मनाळ, वाळूजचे माजी उपसरपंच खालेद पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे गंगापूर खुलताबाद तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर नीळ, पैठण तालुकाप्रमुख मनोज पेरे, मच्छिंद्र देवकर आदींचीही भाषणे झाली. यावेळी त्यांनी समयोचित भाषणे करून मोदी, शहा यांच्या हुकूमशाहीवर प्रकाश टाकत सत्तेचा दुरुपयोग करून भाजपा पैशाच्या वापराने आमदार, खासदार फोडण्यासाठी ईडीचा धाक दाखवत जनतेची दिशाभूल करत आहे. त्यामुळे मोदी सरकारला तडीपार करून आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.

यावेळी माजी अर्थ व बांधकाम सभापती मनोज जैस्वाल, माजी जिल्हा परिषद सदस्य मुकेश बोहरा, गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक छोटूदादा कुंजर, छावणीचे किशोर कच्छवाह, लक्ष्मण सांगळे, विश्वजीत चव्हाण, वाल्मीक शिरसाट, राजूशेठ जैस्वाल, आकाश जैस्वाल, गंगापूर पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर बोरकर, सुदाम पाटील हुले, युवासेनेचे उपतालुका अधिकारी रमेश आरगडे, उपतालुकाप्रमुख मनोज पिंपळे, महिला आघाडीच्या अनिता वाकचौरे, उमा नेव्हाल,
लता ईले,

माजी चेअरमन सर्जेराव भोंड, माजी सरपंच पपीन माने, उपसरपंच योगेश आरगडे, ग्रामपंचायत सदस्य इस्माईलखा पठाण, विभाग प्रमुख बाळासाहेब चनघटे, बाबासाहेब आरगडे, संजय शिंदे, उत्तमराव बनकर पाटील, किरण बोहरा, अनिल सोनवणे, नंदकिशोर काबरा, शेख जमील अहमद, फैयाज कुरेशी, अनिल भुजंग, संतोष धतुरे, वडगाव (को.) बजाजनगरचे माजी सरपंच सचिन गरड पाटील, विभाग प्रमुख कृष्णा राठोड, महेश पवार, विश्वजीत थोरात, नाथा शेळके, साहेबराव गावंडे,

तुषार थोरात यांच्यासह वाळूज, शिवाजीनगर, लांझी, नायगाव, बकवालनगर, शिवराई, रामराई, नारायणपुर परिसरातील मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संतोष धुमाळ यांनी केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *