March 23, 2026

 


वाळूज महानगर, (ता.24) – गणपती उत्सवाप्रमाणे महालक्ष्मी, गौरी गणपतीच्या आकर्षक मूर्ती स्थापन करून तसेच मनमोहक सजावट करत पारंपारिक पद्धतीने महालक्ष्मीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

गोदावरी पार्क, पांडुरंग चौथे यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महालक्ष्मीची घरात स्थापना करून मनोभावे पूजा करून पारंपरिक पद्धतीप्रमाणे गौराईचा उत्सव साजरा केला. यासाठी सुरेखा पांडुरंग चोथे यांनी तीन दिवस महालक्ष्मीची सजावट करुन महालक्ष्मीच्या आकर्षक मूर्ती स्थापन करून सकाळी, संध्याकाळी आरती करून घरात सुख शांती लाभो. अशी चरणी प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी पंचपक्वान्नाचे जेवण करून तिसऱ्या दिवशी पारंपारिक पद्धतीने विसर्जन केले. यावेळी पांडुरंग चौथे यांच्यासह नातेवाईक व मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *