वाळूजमहानगर – महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा औरंगाबादच्या वतीने महिला समितीची स्थापना महासंघाचे राज्य वि.उपाध्यक्ष एन. एन. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश धनवई यांच्या सहअध्यक्षतेखाली करण्यात आली. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे केंद्रीय सदस्य संजय महाळंकर, जिल्हा महासंघाचे कार्याध्यक्ष ताहेर देशमुख, सहसचिव दिनकर अहेवाड यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी निवडण्यात आलेली जिल्हा महिला समितीत अध्यक्ष – प्रमिला कुंभारे, मानद अध्यक्ष – छाया सोनकांबळे, जिल्हा सचिव – भारती निकम, कार्याध्यक्ष – मनिषा कदम, कोषाध्यक्ष -कल्पना अंभोरे, उपाध्यक्ष – छाया पांगारकर, प्रियंका तोनगिरे, आर.एल.सयाई, आशा सानप, अनिता कौडगावकर, ज्योती बनकर, सुनंदा धाडे, शोभा नलावडे, सहसचिव – सी.सी. गवळी, आशा होरकटे, शैलजा सहाणे, व्ही. के. पाटील, मुळे मॅडम, सुनीता परदेशी, सुनीता दहिहंडे, शोभा साळवे, माया पहुरकर, पल्लवी बोर्डे, विजया छत्रपती, कल्पना वडमारे, कंरजे मॅडम, कचरे मॅडम, संघटक अर्चना गहिवार, रुपाली आधापुरे, कल्पना पंडीत, एस.एस.राठोड, आर. बी. कांबळे, गवारे मॅडम, निर्मला काळे, सुनीता सनान्से आदींचा समावेश आहे. पंचायत समिती औरंगाबादच्या सभागृहामध्ये शनिवारी (ता.) 10 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या या महिला समितीच्या स्थापनेप्रसंगी औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामसेविका, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी कार्यकर्ती, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कृषी तांत्रिक कर्मचारी, पशुचिकित्सक, व्यावसायिक कर्मचारी, लिपिक, लेखा लिपीक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, औषध निर्माण अधिकारी या संवर्गातील जवळपास 60 ते 65 महिलांची प्रामुख्याने उपस्थिती होती.