वाळूज महानगर – ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने मसिआच्या वतीने चिकलठाणा कार्यालयात अध्यक्ष किरण जगताप आणि वाळूज येथे उपाध्यक्ष अनिल पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
चिकलठाणा येथे झालेल्या ध्वजवंदन कार्यक्रमास अध्यक्ष किरण जगताप, उपाध्यक्ष भगवान राऊत, सचिव राजेंद्र चौधरी, कार्यकारिणी सदस्य मनीष अग्रवाल यांची उपस्थिती होती. तर वाळूज येथे उपाध्यक्ष अनिल पाटील, सचिव राहुल मोगले, प्रसिद्धी प्रमुख दुष्यंत आठवले, उद्योग संवादचे उपसंपादक सर्जेराव साळुंके, कार्यकरिणी सदस्य अर्जुन गायकवाड, कमलाकर पाटील, हरिश्चंद्र पठाडे, आनंद पाटील, सलिल पेंडसे तर सदस्य अब्दुल शेख व दिलीप चौधरी यांची उपस्थिती होती.