वाळूज महानगर, (ता.27) – मराठा समाजास आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली येथे उपोषणास बसले आहे. त्यांच्या समर्थनार्थ शुक्रवारी (ता.27) रोजी सकाळी साउथ सिटी येथील म्हाडा कॉलनी चौक सिडको वाळूज महानगर 2 येथे अतुल गुलाबराव दाभाडे यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणास संयोजक प्रदीप जामाले पाटील, कृष्ण बोबडे पाटील, बाळासाहेब केरे पाटील, संजय जगताप पाटील, डॉ शंकरराव घायवट दत्तात्रय वर्पे, जगदीश घुणे, अरविंद पावडे, एकनाथ पवार, बाबासाहेब घाडगे, सुमित शेजूळ, संतोष शहाणे, नागनाथ कोकणे व सकल मराठा समज्याच्या वतीने साखळी पद्धतीने पाठिंबा देत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने पुढील आंदोलनाची दिशा ठरल्यास साखळी आंदोलनाचे रूपांतर हे आमरण उपोषणात होईल. असेही अतुल दाभाडे यावेळी म्हणाले. याप्रसंगी सकल मराठा समाजाच्या वतीने एक मराठा, लाख मराठा. अशा घोषणा देण्यात आल्या.