वाळूज महानगर :- मराठवाडा कन्नड सांस्कृतिक संघाच्या वतीने औरंगाबाद आणि बिदर, कर्नाटक येथे सोमवारी (ता.24) रोजी तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाचे M.D. व्ही एम सज्जनारा यांच्या वाढदिवसाचे निमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
औरंगाबाद येथील कार्यक्रमात ऑर्चिड शाळेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास नंदमुरी यांच्या परिवारासोबत मराठवाडा कन्नड सांस्कृतिक संघाच्या वतीने ऑर्किड शाळेच्या प्रांगणामध्ये वृक्ष लावून वाढदिवस साजरा केला.
कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष केशव होन्नल्ली, खजिनदार गुरु चिंचोली, सहसचिव किरण कुलकर्णी, भारती राजन्नावर, साई रेड्डी येचे, गंगाधर पाटील आदी उपस्थित होते. तसेच कर्नाटक मधील कलबुर्गी येथे झालेल्या कार्यक्रमात मराठवाडा कन्नड सांस्कृतिक संघटनेचे सरचिटणीस श्रीनिवास तेलंग यांनी गावातील मान्यवर नेते व कुटुंबीयांसह बसवेश्वर मंदिरात वृक्षारोपण करून व्ही.एस.सज्जनारा यांचा वाढदिवस साजरी केला.