वाळूजमहानगर, (ता.9) – सद्गुरु श्री गजानन महाराजांची सेवा आपल्या जीवनात घडत राहावी, आणि आपल्या अंतकरणातला भक्तीभाव कायम वृद्धिंगत होत राहावा. मनोभावे सेवा केल्यास आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होईल. अशी प्रार्थना वजा उपदेश हभप दादा महाराज वायसळ यांनी श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित वाळुज येथील कलानगरात आयोजित त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगताप्रसंगी काल्याच्या कीर्तनात रविवारी (ता.3) रोजी केले.
वाळुज येथील कलानगरमधील श्री गजानन महाराज मंदिरात प्रगट दिनानिमित्त आयोजित त्रिदिनी सप्ताहाची सांगता रविवारी (ता.3) रोजी हभप दादा महाराज वायसळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. यावेळी त्यांनी
तुझिये संगति । झाली आमुची निश्चिति ॥1॥
नाहीं देखिलें तें मळे । भोग सुखाचे सोहळे ॥ध्रु.॥
घरीं ताकाचें सरोवर । येथें नवनीताचे पूर ॥2॥
तुका म्हणे आतां । आम्ही न वजों दवडितां ॥3॥
या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर किर्तन केले. प्रथम शिवाजीनगर परिसरातून दिंडी काढण्यात आली. त्यानंतर काल्याच्या किर्तन होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमास माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक तुकाराम (छोटू दादा) कुंजर, युवा सेनेचे उपतालुका अधिकारी रमेश आरगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य मुकेश बोहरा, जोगेश्वरीचे माजी सरपंच तथा उद्योजक अमोलभाऊ लोहकरे, उपतालुकाप्रमुख मनोज पिंपळे, युवासेना वाळूज शहर प्रमुख सौरभ वैद्य, सुदामराव खजिनदार, बाबासाहेब शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश केरे, गुरुकुल शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब जाधव, मुख्याध्यापक भगवान पाटील, करतारसिंग पवार, राहुल राजपूत, ग्रामपंचायत सदस्य राहुल भालेराव, पोपट बनकर, माजी सरपंच पपीन माने, शिवसेना उपतालुकाप्रमुख नंदकुमार राऊत, माजी ग्रामपंचायत सदस्य बापू थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे वाळूज शहराध्यक्ष रोहित जाधव, उपाध्यक्ष संजय काजळे, साईनाथ वाघचौरे, शरद बनसोडे, पांडुरंग बोरकर, सचिन पानकडे, कैलास वाकचौरे आदीसह पंचक्रोशीतील भाविक व भजनी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदिर समितीचे आर के भराड, गणेश जगताप, हभप सोमनाथ महाराज राऊत, योगेश चिमखडे, गौरव शिंदे, दत्तू इले, ज्ञानेश्वर आळंजकर, राजू आळंजकर, पांडुरंग राऊत, नामदेव मोरे, अनंता वाघ, रामदास वाघ, महेश पदार, नंदू क्षीरसागर, महेंद्र बोराडे, आकाश म्हस्के, आप्पा शेवाळे व रुस्तुम शेवाळे, हरी गोरे, भाऊसाहेब जेजुरकर यांनी परिश्रम घेतले.

हभप कल्याण महाराज भुजंग –
श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त कलानगर येथे आयोजित त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह दरम्यान ह भ प कल्याण महाराज भुजंग यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी श्री गजानन महाराज मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
‘गण गण गणात बोते’ चा गजर –
यावेळी शिवाजीनगर परिसरातून काढण्यात आलेल्या ग्रंथ मिरवणुकीत ‘गण गण गणात बोते’ च्या गजराने परिसर दुमदुमला होता. मिरवणुकीच्या मार्गातील भाविकांनी ठीकठिकाणी श्री गजानन महाराज यांच्या ग्रंथाचे पूजन केले.
