
वाळूजमहानगर, ता.24 – वाळूज परिसरातील विविध मंदिरातुन नागफणा, घंटा, दिवा असे साहित्य चोरी करणाऱ्या एका आरोपीला एमआयडीसी वाळूज पोलीसांनी अटक करून त्याच्या ताब्यातून 2 लाख 17 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल गुरुवारी (ता.23) रोजी जप्त करण्यात आला.

रांजणगाव येथील महादेव मंदिरातील पिंडीवरील नाग अज्ञात चोरट्यांनी गुरूवारी (ता.9) रोजी चोरी गेला होता. या प्रकरणी राम मंदिराचे अध्यक्ष गंगाराम हिवाळे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासणी करून रांजणगाव परिसरातुन संशयीत आरोपी चंद्रकांत तुकाराम सातपुते (मुळगाव सोनवळा ता. अंबेजोगाई जि. बीड (ह मु कमळापुर) याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने चोरी केल्या कबुली दिली. तसेच बजाजनगरातील मंदिरातही चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने चोरीचा माल ज्या दुकानात विकाला त्याच्या ताब्यातून 7 हजार रुपये किमतीचा पितळी धातुचा नाग, 3 हजार रुपये किमतीचा पितळी घंटा, 1 हजार रुपये किमतीचा पितळी दिवा, 6 हजार 800 रुपये किमतीच्या चारफणी नाग व 2 लाख रुपये किमतीची बुलेट असा 2 लाख 17 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच चोरीचा माल विकत घेणारे मोहम्मद आरेफ खान पाशाखान, मुजीब रहिमान शेख रा. इटावा यांच्या विरूध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरिक्षिक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मनोज शिंदे, पोउपनि प्रविण पाथरकर, दिनेश बन, तपास अधिकारी धिरज काबलिये, हनुमान ठोके, मनमोहनमुरली कोलमी, बाळासाहेब आंधळे, राजाभाऊ कोल्हे, योगेश शेळके, सुरेश कचे यांनी केली.
