February 5, 2026

वाळूज महानगर, (ता.4) – बजाजनगर येथील भोंडवे पाटील शाळेच्या विद्यार्थी खेळाडूंनी 31 ऑक्टोबर 2025 रोजी राजे संभाजी सैनिकी स्कूल, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ॲथलेटिक स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत भोंडवे पाटील शाळेच्या विद्यार्थ्यांनी 6 सुवर्णपदके, 3 रौप्य पदके, 2 कांस्य पदके असे एकूण 11 उच्चांकी पदके पटकावून शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.

या स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थी खेळाडूंमध्ये
14 वर्षे वयोगट 4×100 मीटर रिले मध्ये समरजीत पाटील (सुवर्णपदक), सार्थक चौधरी (सुवर्णपदक), रणवीर शिसोदे (सुवर्णपदक), अंश बिस्वास (सुवर्णपदक), सर्वेष परदेशी (सुवर्णपदक). 14 वर्षे वयोगट 100 मीटर रेसमध्ये समरजीत पाटील (कांस्यपदक). 14 वर्षे वयोगट 200 मीटर रेस मध्ये समरजीत पाटील (रौप्य पदक), 14 वर्षे वयोगट 400 मीटर रेस मध्ये रणवीर शिसोदे (कांस्यपदक). 17 वर्षे वयोगट -पोल वाॅल्ट ऊर्वी आढाव (सुवर्णपदक), श्रावणी जाधव (रौप्यपदक), रुद्र शिंदे (रौप्य पदक) हे सर्व विद्यार्थी खेळाडू जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी होऊन आगामी होणाऱ्या विभागीय ॲथलेटिक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
  या सर्व यशस्वी खेळाडूंचे शाळेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे, मुख्याध्यापक अविराज काळे, उपमुख्याध्यापिका शर्मिष्ठा दत्ता, स्कूल प्रमुख राणी सावंत, प्राथमिक विभाग प्रमुख गहेना शादिजा यांच्यासह सर्व शिक्षक व पालकांनी कौतुक करून होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील क्रीडा शिक्षक रामेश्वर वैद्य, गीता बिदे, पूजा मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *