March 27, 2026


वाळूजमहानगर, (ता.29) – बजाजनगर येथील भोंडवे पाटील पब्लिक स्कूलचा 5 व्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा शुक्रवार व शनिवार रोजी मोठ्या उत्साहात झाला. यात शाळेच्या चिमुकल्यांनी नृत्य व नाटीकांच्या माध्यमातून वसुधैव कुटुंबकम् या संकल्पनेवर आधारित जागतिक मानवी जीवन मूल्यांचे सुरेख सादरीकरण केले.


ब्रम्हांडातील विष्णू, लक्ष्मी व नारद यांच्या अभिनयातील संवादाने सर्वच मंत्रमुग्ध झाले. अध्यक्षस्थान शाळेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे यांनी भूषवले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माननीय शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, तहसीलदार रमेश मुनलोड, ज्ञानदा स्कूलचे अध्यक्ष नागेश जोशी, उद्योजक संतोष लड्डा उपस्थित होते. दीपप्रज्वलन व गणेश वंदना करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षात झालेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रीडाविषयक घडामोडींचा अहवाल विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सादर करण्यात आला.

त्यानंतर ‘वसुधैव कुटुंबकम् ‘संकल्पनेवर आधारित नृत्य व नाटकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वैश्विक जीवन मूल्यांचे प्रभावी सादरीकरण करत आनंदी जीवन, प्रदूषण, शाळा व्यवस्थापन, कौटुंबिक जीवन, स्वच्छता अभियान, हवामानातील बदलांचे परिणाम, जागतिक तापमान वाढ, वृक्ष संवर्धन, अन्नसुरक्षा, जलसंवर्धन, वीज संवर्धन, डिजीटल इंडिया, राष्ट्रभक्ती, विश्वबंधुत्व यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वरी जोशी, सृष्टी साळे, तेजस्विनी सावंत यांनी केले. तर स्नेहल मेंगडे हिने आभार मानले.

कार्यक्रमास शाळेच्या सचिव मीनाक्षी भोंडवे, महेश भोंडवे, गणेश भोंडवे, विजय उखळे, मुख्याध्यापक रवी दाभाडे, उपमुख्याध्यापिका शर्मिष्ठा दत्ता, समन्वयक राणी सावंत, गहेना शादीजा यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *