
वाळूज महानगर (ता.11) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शालेय विभागीय ॲथलेटिक्स मैदानी स्पर्धेत भोंडवे पाटील पब्लिक स्कूलने सहभाग नोंदवत दणदणीत विजय संपादन केला.
या स्पर्धेमध्ये भोंडवे पाटील पब्लिक स्कूल बजाजनगर या शाळेला पाच सुवर्ण पदक व एक रौप्य पदक मिळवले असून या खेळाडूंची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स (मैदानी) स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत खेळाडूंनी 4×100 मिटर रीले 14 वर्षे वयोगटात विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवून भोंडवे पाटील स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या विजयी खेळाडू मध्ये समर्जीत पाटील (गोल्ड मेडल), सार्थक चौधरी (गोल्ड मेडल), अंश बीश्वास (गोल्ड मेडल), रणवीर सिसोदिया (गोल्ड मेडल), सर्वेश परदेशी (गोल्ड मेडल) यांचा समावेश आहे. दोनसे मीटर धावणे – समर्जीत पाटील (सिल्वर मेडल) या खेळाडूची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली.
या खेळाडूंना भोंडवे पाटील पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्योगपती, शिक्षण महर्षी हनुमान भोंडवे, मुख्याध्यापक अविराज काळे, उपमुख्याध्यापिका शर्मिष्ठा दत्ता, माध्यमिक स्कूलच्या प्रमुख राणी सावंत, प्राथमिक स्कूलच्या विभाग प्रमुख गहेना शादीजा यांच्यासह शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढील होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. भोंडवे पाटील पब्लिक स्कूलचे क्रीडा विभाग प्रमुख तथा ॲथलेटिक्स रामेश्वर वैद्य यांचे या खेळाडूंना नियमित मार्गदर्शन लाभले असून बजाजनगर परिसरात सर्वत्र या खेळाडूंचे कौतुक केले जात आहे.
