
वाळूजमहानगर, (ता.13) – बजाजनगर येथील भुमिपुत्र सामाजिक संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव निमित्त राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून शुक्रवारी (ता.12) रोजी अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास मयूर इंडस्ट्रिजचे सुर्यभान राउतराज पाटील, गरूड झेप ॲकॅडमीचे संचालक निलेश सोनवणे, सहयादी ॲकॅडमिचे खेडकर, भूमिपूत्र संस्थेचे संचालक आर्जुनराव आदमाने पाटील, पोपटराव अधिकपाटील, उद्योजक कैलास भोकरे, रमेश शेळके, विजय जाधव, काकासाहेब चेळेकर, रामदास पैठणपगारे,विजय जाधव, भाऊसाहेब डमाळे,पोपट हांडे, साहेबराव पाथरीकर, आसाराम करपे, संजय पेरे आदी उपस्थित होते.
