March 24, 2026

वाळूजमहानगर, (ता.24) – भारत राष्ट्र समिती पक्ष संघटन व प्रचार अभियानाला गंगापूर तालुक्यातील जामगाव येथून बुधवारी (ता.24) रोजी सुरुवात करण्यात आली. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले. यावेळी बी आर एस चे नेते संतोष माने म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी मुबलक पाणी, मोफत वीज अशा विविध योजना राबविणार तसेच गंगापूर, खुलताबाद मतदारसंघातील प्रत्येक गावात पक्षाच्या विविध नऊ प्रकारच्या समित्या स्थापन करून पक्षाचे संघटन व प्रचार करणार.

पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे राज्य आणण्यासाठी भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सदस्य महानोंदणी अभियानाच्या माध्यमातून विद्यानसभा मतदार संघातील प्रत्येक गावात पक्षाची मेन कोअर कमिटी, किसान कमिटी, महिला कमिटी, युवा कमिटी, विद्यार्थी कमिटी, एस.सी कमिटी, ओबीसी कमिटी, एस टी मायनॉरिटी कमिटी अश्या एकूण नऊ प्रकारच्या कमिट्या स्थापन करून संघटन मजबूत करण्यात येणार आहे. प्रत्येक गावात पक्षाचा गुलाबी ध्वज फडकून आपकी बार किसान सरकार, असा नारा देत पक्षाचा किसान रथ गावोगाव फिरून गाण्याच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करणार आहे.

पक्षाचे ध्येयधोरणे शेतीसाठी भरपूर आणि मोफत पाणी उपलब्ध करून जेथे विहीर, बोअर, नदीला पाणी उपलब्ध आहे. तेथे हे पाणी शेतीला घेण्यासाठी योग्य दाबाची वीज मोफत देणे, भेसळमुक्त, दर्जेदार बियाणे व खते वेळेवर उपलब्ध करून देणे. हे आमचे काम राहणार आहे. तसेच पेरणीच्या वेळी शेती खर्चासाठी आर्थिक मदत केली पाहिजे. पीक संरक्षण आणि अधिक उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान, शेतकर्यांनी पिकविलेल्या संपूर्ण शेतमालाची सरकारी खरेदी केंद्राने खरेदी करणे, शेती मालाच्या उत्पादीत खर्चावर आधारित योग्य भाव मिळाला पाहिजे, शेतकन्यांच्या शेतीच्या नोंदी डिजिटल करून शेतीचे वाद संपविणे. यासह अन्य कल्याणकारी योजना समजून सांगत पक्षाने वितरीत करण्यासाठी दिलेले माहितीपत्रक घरोघरी देऊन महा सदस्य नोंदणी अभियानाची मोहीम एक चळवळीच्या स्वरूपात गावागावात तयार होऊन येणाऱ्या काळात भारत राष्ट्र समितीचे गुलाबी वादळ विधानसभेचे तक्त काबीज केल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा निर्धार माने यांनी पक्षाच्या वतीने केला.

यावेळी बाजार समितीचे माजी सभापती विनोद पाटील काळे, वाल्मीक शिरसाट, आप्पासाहेब माने, संपत रोडगे, संतोष हिंगमिरे, शंकर ननूरे, बाबासाहेब चव्हाण, सुभाष माने, समाधान गायकवाड, गणेश चव्हाण, बाळुभाऊ शिंदे, संजू वाघचौरे, ग्रामपंचायत सदस्य गफार पठाण, नवनाथ बरबडे, राजू बत्तीशे, राजू जाधव, अमजद खान, दत्तात्रय माने, नंदूभाऊ सोनवणे, राहुल बोडखे, समीर शेख, हुसैन पटेल, धर्मेंद्र माने, शाहरुख शेख, तोफिक पटेल, संजय मगर, विनोद माने, काकासाहेब माने, ईश्वर पंडित, भगवान ठवाळ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *