February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.15) – घर मालक आणि भाडेकरू यांचे अत्यंत विश्वासाचे नाते असते. मात्र याच विश्वासाच्या नात्याला काळे फसवत चक्क भाडेकरूनेच घर मालकाच्या घरात चोरी करून सोन्याच्या दागिन्यासह किमती साड्या मिळून जवळजवळ एक लाख रुपयाचा ऐवज लंपास केला ही चोरीची घटना मंगळवारी (ता.13) रोजी उघडकीस आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अनिता सतीष गोयल (वय 48) या पती, दोन मुली, जावई व एक लहान नात यांच्यासह प्लाट नंबर 35, हनुमाननगर वाळुज ता. गंगापूर येथे एकत्र राहतात. त्यांची मोठी मुलगी पुजा कारके हिचे लग्न झाल्यापासुन ती त्यांच्यासोबत राहाते. 600 स्केअर फुटाचा प्लाटवर दोन मजली इमारतीत खालच्या एका रुममध्ये पुजा शरद कारके व जावई शरद कारके व नात प्रिशा कारके राहतात. तर दोन रुम निलेश शिवनकर यास भाड्याने दिल्या आहे. गोयल या वरच्या मजल्यावर राहतात. मंगळवारी 13 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास खालच्या रुममध्ये 3 साड्या कपाटातून चोरी गेल्याचे समजले त्यानंतर ताबोडतोब वरच्या मजल्यावर वाढदिवसाच्या दिवशी सोप्याच्या बाजूला असलेल्या ड्रावर मध्ये ठेवलेले दागिने पाहिले असता त्यातील

30 हजार रुपये किमतीचे सोन्याच्या पट्ट्या असलेले 10 ग्रम वजनाचे गंठण, 30 हजार रुपये किमतीचे 10 ग्रँम वजनाचे नेकलेस, 15 हजार रुपये किंमतीचे 5 ग्रँम वजनाची व 66 मणी असलेली सोन्याची पोत, 18 हजार रुपये किंमतीच्या व प्रत्येकी 3 ग्रँम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, 1 हजार 500 रुपये किमतीच्या प्रत्येकी 1 हजार रुपये किमतीच्या तीन साड्या. असा एकूण 96 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे व साड्या चोरून नेल्याचे उघडकीस आले. ही चोरी घरात राहणारे भाडेकरु निलेश एकनाथ शिवनकर (वय 30), पुजा निलेश शिवनकर (वय 25) दोघे (रा. शिनगाव जहागीर ता. देवुळगाव राजा) ह.मु. हनुमाननगर, वाळुज. गजानन बाबुराव मानकर (वय 32), फब्रिकेशन मजुर गरवारे कंपनीच्या पाठीमागे रा. म्हसोबा गल्ली यांनी केल्याचा संशय आल्याने त्यांच्या घरी जावुन दागिने चोरी झाल्याबाबत त्यांना विचारणा केली. तेव्हा त्यांच्या बोलण्यावरुन त्यांच्यावर बळावला. त्यांच्या घरात पाहणी केली असता चोरी झालेल्या दागिन्यापैकी 2 ग्रँम वजनाची सोन्याची अंगठी मिळुन आली. याप्रकरणी अनिता सतीष गोयल यांच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात आरोपी निलेश शिवणकर पूजा शिवणकर व गजानन मानकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण जाधव करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *