वाळूजमहानगर, ता.30 – मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे. मला तुमची खोली भाड्याने द्या. असे म्हणून भाडेकरू म्हणून आलेल्या संशयित आरोपीने घरमालकाच्या घरी डल्ला मारून रोख पन्नास हजार रुपये व कपडे असा ऐवज लुटून पोवारा केला. हा प्रकार गुरुवारी (ता.28) रोजी सायंकाळी उघडकीस आला.
याबाबत शोभाबाई गणेशराव वडगांवकर
रा. कासार गल्ली, वाळूज पोलिसांना दिलेल्या एका तक्रार अर्जात असे म्हटले आहे की, संशयित आरोपी रमेश राजगुरु हा किरायाने खोली घेण्यासाठी आला. मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे. मला तुमची खोली भाड्याने द्या असे म्हणत तो घरात भाडेकरू म्हणून दोन महिण्यापासून रहात होता. संशयित आरोपी राजगुरू व त्याचे आई वडील असे तीघे जन राहात होते. वडगावकर यांचा बांगडी चा व्यवसाय आहे. या बागडीच्या धंद्यातील 50 हजार रुपये वडगावकर यांनी कपाटात ठेवते होते. वडगावकर कुटुंब धंद्यानिमित्त दिवसभर घराबाहेर असतात. गुरुवारी (ता 28) रोजी सकाळी बाहेर पडलेले वडगावकर सायंकाळी 8 वाजता घरी आले. व कपाट उघडुन बघीतले असता त्यांना कपाटात ठेवलेले 50 हजार रुपये दिसले नाही. त्यामुळे वडगावकर यांनी त्यांच्या घरात असलेले भाडेकरू राजगुरू यांच्याकडे विचारपूस करण्यासाठी गेले असता ते घरात दिसले नाही.
आरोपी राजगुरू हे कुटुंबासह गायब असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे वडगावकर यांची खात्री झाली की, आरोपी राजगुरू यांनीच कपाटातील रोख 50 हजार रुपये, कपडे व इतर ऐवज घेऊन पोबारा केला. त्यानंतर वडगावकर यांनी वाळुज पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.