
वाळूजमहानगर (ता.27) – बजाजनगर मोहटादेवी मंदिर परिसर भाजीमंडईतील हातगाडी व दुकानाची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड करून नुकसान केली. घटना घडली. आरोपीवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी भाजीपाला विक्रेत्यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर रविवारी (ता.26) रात्री ठिय्या दिला.
याविषयी मिळालेली माहिती अशी की, बजाजनगर भाजीमंडईत ज्ञानेश्वर भिकाजी गावडे रा..बजाजनगर यांच्या भाजीपाला विक्रीच्या सहा हातगाडी व दुकाने आहेत. गावडे हे शनिवारी रात्री दुकाने बंद करून व हातगाडी लावून घरी गेले. त्यानंतर त्यांच्या हात गाडीचे व दुकानाची तोडफोड करून नुकसान केले. ही घटना सकाळी उघडकीस आली. या घटनेत भाजीपाला विक्रेत्यांचे एक तर दीड लाखाचे नुकसान झाले. त्यामुळे तात्काळ ही माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना दिली. मात्र पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. घटनेची माहिती मिळताच भाजीमंडईतील सर्व भाजीपाला विक्रेते एकत्र येऊन भाजीमंडई बंद ठेवत या घटनेचा निषेध केला. व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले. मात्र गुन्हा दाखल केला जात नसल्याने पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. जवळपास दोन ते तीन तास ठिय्या दिल्यानंतर पोलिसांनी या घटनेची पोलीस दप्तरी नोंद घेतली.
