वाळूजमहानगर – बजाजनगर परिसरातील भगवान महावीर स्कूल मधील विद्यार्थ्यांनी सिडको परिसरातील राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र संचलित कै.रंगलालजी बाहेती या अंध मुलींच्या निवासी व्यवसाय प्रशिक्षण केंद्राला प्रकाशाचा उत्सव दिवाळी या सणाचे औचित्य साधून भेट दिली.
यावेळी विद्यार्थ्यांनी येथील मुलींचे शिक्षण – प्रशिक्षण, प्रत्यक्ष कामकाज, निवास हे सर्व कसे काय चालते. याबाबत माहिती मिळवली. तसेच दिवाळीनिमित्त शिक्षक व विद्यार्थी यांच्या उत्स्फूर्त सहभागाने यांच्यातर्फे या मुलींना भेट वस्तूही दिल्या. त्याचबरोबर यावेळी विद्यार्थ्यांनी या मुलींसोबत व तेथील सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून सर्व बाबींचे निरीक्षण केले. यानिमत्ताने सामजिक जाणिव बांधिलकी यासारखे मूल्य रुजवणे, ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाप्रती आपले कर्तव्य ही भमिका मुलांना समजावण्याचा छोटासा प्रयत्न केला. यावेळी वस्तीगृहातील अधीक्षक ज्ञानेश्वर वरकड तसेच कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका कल्याणी सांगोले व संगिता काकडे, बरखा डोहळे, अविनाश बोरकर, करूणा चोपडे, राजश्री सानप या शिक्षकांनी केले.