वाळूजमहानगर – प्रकाशाचा उत्सव म्हणजेच दीपावली, भगवान महावीर स्कूल बजाजनगर येथे अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संस्थेचे अध्यक्ष शांतीलाल सिंगी, उपाध्यक्ष पद्माकर कदम तसेच संस्थेचे संचालक किशोर राका हे उपस्थित होते.
यावेळी शाळेमध्ये दिवाळीच्या सर्व दिवसांची आकर्षक अशी मांडणी करण्यात आली. यामध्ये अभ्यंग स्नान, वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन असे विविध देखावे तयार करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शांतीलाल सिंगी यांच्या हस्ते पूजनही करण्यात आले.
तसेच यानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक अशा पणत्यांची सजावट, आकर्षक सुंदर असे स्वतः बनवलेले पर्यावरणपूरक आकाश दिवे विविध सजावटीचे साहित्य तोरण अशा अनेक वस्तू तयार करून शाळा, वर्ग सजवले. या सणाचे औचित्य साधून संचालक मंडळांनी शाळेतील सर्व शिक्षक वर्गांना मिठाई व भेट वस्तू दिल्या. तर मुलांना पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करावी याविषयी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्याणी सांगोले यांनी व शिक्षकांनी मार्गदर्शन केले.