March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.16) – भरधाव जाणारी दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात ईसारवाडी फाटा ते पैठण रोड वरील भगतवाडी फाट्यावर मंगळवारी 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी झाला. 

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, दत्तू लक्ष्मण मोरे (वय 32) रा. भगतवाडी तालुका गंगापूर हे मंगळवारी 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास गंगापूरहून भगतवाडीला जात असताना भगतवाडी फाट्यावर त्यांची दुचाकी (एम एच 20, डीपी -2186) स्लीप होऊन जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच ईसारवाडी पॉईंटवर असणारी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी नानिज् धाम यांच्या विनामूल्य अंबुलन्सचे पायलट संदीप त्रिंबके यांनी जखमी दत्तू मोरे यांना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे दाखल केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *