February 21, 2025

वाळूजमहानगर, (ता.25) – दोघांचे सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची व वडिलांना जीवे मारून टाकण्याची धमकी देवुन 19 वर्षीय तरुणीला ब्लॅकमेल करून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. हा प्रकार बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात असलेल्या रायगड इन लॉजिंग येथे 5 सप्टेंबर ते 30 डिसेंबर 2024 दरम्यान वेळोवेळी घडला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागात राहणारी 19 वर्षीय विद्यार्थिनी महाविद्यालयीन शिक्षण घेते. त्यांच्या घरी किराणा दुकान आहे. घरी कोणी नसल्यावर ती दुकानात बसते. 5 सप्टेंबर रोजी पीडित विद्यार्थिनी दुकानात असताना रवी राजू मोरे या 25 वर्षीय आरोपीची तिच्याशी ओळख झाल्याने तो दुकानावर यायचा. त्यावेळी त्याने तीला त्याचा मोबाईल नंबर दिला. त्यानंतर दोघे मित्र म्हणुन फोनवर बोलत. सप्टेंबर 2024 मध्ये एक दिवस ती छत्रपती संभाजीनगर येथे असताना आरोपी येथे आला. ती व त्याने सोबत मित्र या नात्याने मोबाईलमध्ये फोटो काढले. काही दिवसांनी तो तीला म्हणाला की, तु माझ्या सोबत हॉटेलवर चल, नाहीतर मी काढलेले फोटो तुझ्या आईवडिलांना दाखवितो. असे म्हणुन तीला महाराणा प्रताप चौक, बजाजनगर येथील रायगड इन लॉजिंगवर नेऊन बळजबरीने बलात्कार केला. व तिला दुचाकीवरून कॉलेजवर नेवुन सोडले. त्यानंतर तो तीला कॉलेजमध्ये येवुन भेटायचा. आठ दिवसानंतर त्याने पुन्हा तिला बजाजनगर येथील त्याच लॉजवर नेऊन तिच्यासोबत जबरदस्ती करुन शारीरिक संबंध ठेवले. 30 डिसेंबर 2024 रोजी तो तीला नेहमीप्रमाणे कॉलेजला येवुन भेटला. व म्हणाला की, तु माझ्या सोबत चल. त्याला तिने नकार देताच आरोपीने तिच्या वडीलांना मारुन टाकण्याची धमकी देत परत त्याच लॉजवर जबरदस्ती करून शारिरीक संबंध ठेवले. हा प्रकार दोन ते तीन वेळा घडला. मात्र जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे तिने आईवडीलांना घडलेल्या घटनेची माहीती दिली नाही. परंतु तो तीला वारंवार त्रास देवु लागल्यामुळे घटनेची माहीती आईला सांगितली. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी रवी मोरे याच्या विरुद्ध कलम 64 (2) (एम), 351(2) बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. संजय गिते करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *