वाळुज महानगर – महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे महासचिव भरतकुमार व्हावळ यांचे छत्रपती संभाजीनगरात येण्यापूर्वी वाळुज महानगरात आगमन झाले. यावेळी त्यांचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा हौशी बॉक्सिंग संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी मराठवाडा व छत्रपती संभाजीनगरमध्ये बॉक्सिंगचे प्रशिक्षण, बॉक्सिंग खेळ कसा वाढवता येईल.
तसेच ग्रामीण भागातील खेळाडूपर्यंत बॉक्सिंग हा खेळ कसा पोहोचेल. याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रशिक्षण वर्ग गावोगावी सुरू करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी रेफरी जज कमिशन सेक्रेटरी अभिमान सुर्यवंशी, पुणे रेफरी जज सनी परदेशी, राष्ट्रीय पदक विजेता (पुणे) आसिफ शेख, हौशी बॉक्सिंग संघटनेचे सचिव नील पाटील, प्रा कैलास जाधव, बळीराम राठोड, लक्ष्मण कोळी, अरुण भोसले आदींची उपस्थिती होती.
