March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.8) – वाळूज व चितेगाव औद्योगिक वसाहतीतील कामगारांना दीपावली व दसऱ्यानिमित्त दरवर्षी बोनस वाटप करण्यात येतो. त्याचाच एक भाग म्हणून चितेगाव येथील बी जी फास्टिंग कंपनीच्या कामगारांना न्यू पॅंथर कामगार सेनेच्या पुढाकाराने भरघोस बोनससह चांदीचा शिक्का देण्यात आला.

औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या विविध अडचणी व समस्यांसह वेळोवेळी पगार वाढीचा करार त्याचप्रमाणे कंपनी व कामगारांच्या हिताचा निर्णय कामगार संघटनेच्या मार्फत घेण्यात येऊन कामगार व कंपनीमध्ये समन्वय साधला जातो. परिणामी कामगार व कारखानदार यांच्यातील हितसंबंध अतूट राहतात.

चितेगाव येथील बी जी फास्टिंग या कंपनीत न्यू पॅंथर कामगार सेनेची शाखा आहे. या कामगार संघटनेच्या पुढाकाराने कामगारांना दसरा व दीपावली निमित्त 32 हजार 500 रुपये असा भरघोस बोनस देऊन 20 ग्राम चांदीचा शिक्काही देण्यात आला. त्यामुळे कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी न्यू पॅंथर कामगार सेना या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल दाभाडे, कंपनीचे सीईओ डेव्हिड करणो, प्लांट हेड चावलाजी, मार्केटिंग हेड समीक्षा बुशर, सखीचंद यादव, कमिटी मेंबर सदावरते, वाळे पाटील, आसाराम धरफळे, करीम पठाण, मस्के, व ईतर कामगार व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच कंपनीत काम करणाऱ्या परमानंट कामगारांसह  कॅज्युअल कामगारांना सुद्धा दिवाळीनिमित्त थोडाफार का होईना दिवाळी बोनस देण्यात यावा. अशी मागणीही न्यू पॅंथर कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनील जाभाडे यांनी कंपनी व्यवस्थापक  तसेच कामगार आयुक्तांकडे केली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *