March 23, 2026

 

 

वाळूजमहानगर, (ता.15) – रोडवर लावलेल्या गाड्या बाजूला लावा. असे म्हणाल्याचा राग आल्याने तीन जणांनी एकाला शिवीगाळ करत बियरची रिकामी बाटली डोक्यात मारून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (ता.14) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास बजाजनगर येथे घडली.
याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा आशय असा, रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्रीकृष्णनगरात राहणारा राजू गोपीनाथ महाजन (वय 38) हा शुक्रवारी (ता.14) रोजी दुपारी 3:45 वाजेच्या सुमारास बजाजनगर येथील अंकुर हॉटेल समोर असताना तेथे रोडवर गाड्या उभ्या होत्या. रोडवर लावलेल्या गाड्या बाजूला लावा. असे महाजन म्हणाला असता अनोळखी तीन इसमांनी शिवीगाळ करत हाताचापटाने व बियरची रिकामी बाटली डोक्यात मारून जखमी केले. व पुन्हा इकडे भेट असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी राजू गोपीनाथ महाजन यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम-118(1 ), 115(2), 352, 351(2), 3(5) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *