
वाळूजमहानगर, (ता.22) – मित्राला भेटून येतो, असे म्हणून गेलेला 22 वर्षीय तरुण अद्यापही घरी न परतल्याने तो बेपत्ता झाल्याचे नोंद वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी (ता.20) रोजी करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साजापूर येथील सचिन युवराज साबळे वय 22 हा तरुण 25 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास राहत्या घरातून निघून गेला होता. तो घरी न आल्याने त्याचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. याप्रकरणी साबळेचे वडीलांच्या खबरीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप गुरुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पि के जायभाय करीत आहे.
