
वाळूज महानगर, (ता.16) – बसवंतराव पाटील प्राथमिक व माध्यमिक इंग्लिश स्कूल रांजणगाव (शे.पू.) मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आय जी जाधव होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष आय जी जाधव यांनी भारताचे अकरावे राष्ट्रपती आणि जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, 15ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूमधील रामेश्वर येथे कलाम यांचा जन्म झाला. अग्नि आणि पृथ्वी या दोन क्षेपणास्त्र निर्मितीच्या तंत्रज्ञानामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान होते. त्यांना ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाते. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘वाचन प्रेरणा दिवस’ साजरा करून भाषणाद्वारे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे विचार व्यक्त केले. तसेच शाळेमध्ये मिनी सायन्स प्रोजेक्ट – विज्ञान दिवसाचे आयोजन करण्यात आले. सोबत निंबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, ग्रीटिंग स्पर्धा असे विविध उपक्रमांद्वारे जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमास मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, संस्थेचे सचिव हरीश जाधव, माध्यमिकचे मुख्याध्यापक बी व्ही शिरसाट, प्राथमिकच्या रेखा बिदरकर, हनुमान जाधव, निलेश मिसाळ, संभाजी जाधव, प्रीती नरवडे, दीप्ती झाडे, सोनी कुमारी, लता वैष्णव, पूजा खोतकर, पूजा ठाकूर, ममता खोतकर, हर्षदा भुम्बे, हनुमान जाधव, अर्चना भुर्जे, अस्मिता तायडे, विजया पवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन रेखा बिदरकर यांनी केले. आभार दीप्ती झाडे यांनी मानले.
