March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.6)- प्रेम संबंध जुळल्याने घरातील मंडळीच्या विरोधात एका 14 वर्षीय मुलीने प्रियकरा बरोबर पळून जाऊन लग्न केले. ती सासरी नांदत असतांना तीच्यावर नातेवाईकानेच बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर तीचा गर्भपात करून मारहाण करत माहेरी नेऊन सोडले. त्यानंतर अल्पवयीन विवाहितेने पोलिसांसमोर कैफियत मांडल्याने नात्याला काळीमा फासणारी ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे वाळूज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पैठण तालुक्यातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी भाऊ-बहीण व आजी सह राहत होती. तीचे तीच्या नात्यातीलच सोहेल बशीर खान (20) रा. वाळुज परिसर याच्या बरोबर प्रेमसंबध जुळले. मात्र त्यांच्या लग्नास मुलीची आजी, काका यांचा विरोध होता. त्यामुळे तीने पळून जाऊन सोहेल याच्या बरोबर 20 मार्च 2023 रोजी लग्न केले. लग्नानंतर ती अल्पवयीन मुलगी पतीसह सासरी नांदवयास आली. तेथे ती घरी एकटी असतांना तिचा पती सोहेल खान याचा मावस भाऊ अन्वर सलिम शेख रा. वाळुज परिसर याने तीच्यावर बळजबरी करून अत्याचार केला. ही माहिती पीडित मुलीने पतीला सांगितली. मात्र त्याने तीच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यामुळे पती-पत्नी मध्ये कायम वाद होत होते. त्यानंतर सुमारे दिड महिन्याने अन्वरने पुन्हा तीच्या घरी येऊन तीच्यावर बळजबरी करून अत्याचाराचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी तीने त्यास विरोध करीत मारहाण केली. तेव्हा पासुन सासरकडील मंडळी तीला सतत त्रास देत होते. दरम्यान ती 4 महिन्याची गरोदर असतांना सासू,पती व पतीची मावशी यांनी पीडित मुलीला काहीतरी औषध देऊन तीचा गर्भपात केला. त्यानंतर तीला माराहाण करीत माहेरी नेऊन सोडले. या प्रकरणी पीडित मुलीने पिंक पथक उपविभाग छत्रतपी संभाजीनगर ग्रामिण यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी तिचा जबाब घेऊन वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात वर्ग केला. त्यानंतर तिचे मेडिकल करून आरोपी पती सोहेल बशीर खान, सासु सुरैय्या बशीर खान, सोहेलची मावशी जमीला सलीम शेख व तीचा मुलगा अन्वर सलीम शेख यांच्या विरूध्द शुक्रवारी (ता.5) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरिक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रध्दा वायदंडे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *