वाळूजमहानगर, (ता.23 – बजाजनगर येथील जागृत हनुमान मंदिरासमोर उभी केलेली दुचाकी 27 फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाटोदा येथील अजय पवार याने 27 फेबु्रवारी रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास जागृत हनुमान मंदिरा समोर दुचाकी (एमएच 16 एजी -9688) ही हॅन्ड लॉक करून उभी केली होती. दर्शन करून रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पवार हा मंदिरातून बाहेर आला असता, उभ्या केलेल्या ठिकाणी दुचाकी दिसून आली नाही. म्हणून तिचा आजूबाजूला इतत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोह केशव चौथे करीत आहे.
