March 25, 2026

वाळूजमहानगर, (ता.5) – शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी व भाजपाचा ग्रामपंचायत सदस्य यांच्यात बजाजनगर येथे रविवारी (ता. 2) रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास झालेल्या तुफान राड्याप्रकरणी परस्परांच्या तक्रारीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात 7 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.


या तक्रारीत सागर शिंदे याने असे म्हटले आहे की, रविवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास तो कार घेऊन घरी निघाला होता. त्यावेळी त्याच्या कारसमोर दोन जण दुचाकीवरून आले. वेळीच ब्रेक दाबल्याने ते बालंबाल बाचवले. त्यानंतर सागर हा त्यांना समजावून सांगत असतांनाच प्रसाद काळे हा तेथे आला. आणि वाद घातल्याने दोघात झटापट झाली. त्यानंतर प्रसाद याने विजय सरकटेसह दोन जणांना बोलवले. त्यांनतर विजय सरकटे तेथे येऊन सागर शिंदे यास जाब विचारत त्याच्या डोक्यात लोंखडी रॉड मारला. दरम्यान त्यावेळी सागरचे वडील तेथे आले. त्यांनी त्यास सोडवीले. त्यानंतर तीघांनी सागर व त्याच्या वडीलाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तर विजय सरकटे याने दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, विजय सरकटे हा घरी जेवन करत असतांना रवि म्हस्के याने फोन करून सागर शिंदे याने मारहाण केल्याचे सांगितले. त्यानंतर विजयने तेथे जाऊन रविला का मारले? असे
सागर शिंदे याला विचारले. त्यावेळी तुु बादशहा आहे का? असे म्हणत सागर शिंदे याने शॉकपचा रॉड विजय सरकटे याच्या पाठीवर मारला. व त्याच्या एका मित्राने हातावर धारदार शस्त्राने मारून जखमी केले. त्यानंतर सागरच्या वडीलांनी सरकटे याला लाथबुक्याने मारहाण केली. त्याचवेळी सागरने विजयला शॉकअपचा रॉड मारल्याने तो बेशुध्द झाला. असे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी दोघांच्या तक्रारीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात 7 जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *