March 25, 2026

वाळूजमहानगर, ता.20 – राजा शिवाजी माध्यमिक उच्चमाध्यामिक विद्यालय बजाजनगर येथील बुथ क्रमांक 3 मध्ये सविता गोविंद जाधव ही महिला मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी गेली असता, तीचे मतदान दुसरेच कोणीतरी करून गेल्याचे तीला समजले.

त्यामुळे तीने मतदान केंद्र अधिकारी यांना विचारना केली असता, मतदान यादीतील नावा समोरील फोटोमध्ये बदल असल्याचे सांगितले. मात्र त्याच्या या स्पष्टी करणावर महिलेचा विश्वास बसला नाही. त्यामुळे मतदान करण्याचा तीने केंद्र प्रमुखाला विनंती केली. मात्र त्यांनी महिलेला मतदान करु दिले नाही. परिणामी मतदानापासून वंचित ठेवले, माझा मतदानाचा हक्क हिरावून घेतला. असे म्हणत महिला घराकडे परतली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *