March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.22)- अयोध्येत साजरा होत असलेल्या रामोत्सवानिमित्त बजाजनगरात 32 हजार पाकीट बुंदीच्या प्रसादाचे आज वाटप करण्यात येणार आहे.

बजाजनगरातील सामाजिक कार्यकर्ते मयूर संतोष चोरडिया आणि किशोर पाटील या रामभक्ताकडून 3 टन बुंदीचे 32 हजार प्रसाद पाकिटाचे वाटप करण्यात येणार आहे. या प्रसाद पाकिट वाटपाचा शुभारंभ सोमवारी (ता.22) जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. प्रथम इंद्रप्रस्थ काॕलनीतील राम मंदिर येथे प्रभू श्रीराम प्रतिमापूजन आणि महाआरती होईल. या आरतीनंतर महाप्रसाद वाटपाला प्रारंभ करण्यात येणार आहे. बजाजनगरातील घरोघरी प्रसादाचे वाटप करत रात्री 10 वाजता जागृत हनुमान मंदिर येथे समारोप होणार आहे. या प्रसादाचा लाभ राम भक्तांनी घ्यावा. असे आवाहनही मयूर चोरडिया व किशोर पाटील यांनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *