February 5, 2026

वाळुज महानगर, (ता.7) – बजाजनगर मधील मोहटादेवी मंदिर परिसरात मोहटादेवी मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमिताने 50 लिटर दुधाचा महाप्रसाद करण्यात आला होता.

मोहटादेवीची मध्यरात्री बारा वाजता आरती करून मंदिर परिसरातील सर्व देवतांना दुधाचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर सर्वांनी दुधाच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी मोहटादेवी मित्रमंडळाचे प्रभाकर बडे, दिनेश राऊत, नाना फुंडे, जगन्नाथ थोरात, व्यंकटी टेकाडी, कैलास नागरगोजे, विजय आहिरकर, सचिन शिंदे, प्रकाश शिंदे, रामेश्वर तौर, ज्ञानेश्वर फुंडे, महेश पाटील, महादेव गरड, बाबुराव नागरगावे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *