वाळूजमहानगर – बजाजनगर येथील रामलीला मैदानावर गेल्या नऊ दिवसापासून सुरू असलेल्या रामलीला कार्यक्रमात राम आणि रावणाचे युद्ध होऊन रावणाचा वध झाला. आणि त्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत जय श्रीरामाचा जयघोष व फटाक्यांच्या आतिषबाजीत केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते 61 फुटी रावणाच्या पुतळ्याचे बुधवारी (ता.5) रात्री रावण दहन करण्यात आले. हा रावण दहन कार्यक्रम पाहण्यासाठी अलोट गर्दी झाली होती.
बजाजनगर येथे 20 वर्षापासून उत्तर भारतीयांच्या वतीने घटस्थापने पासून नऊ दिवस रामलीला व दसऱ्याच्या दिवशी रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे हा कार्यक्रम बंद होता. यावर्षी सर्व निर्बंध शिथिल झाल्याने या कार्यक्रमाची सर्वांनाच उत्सुकता होती. रामलीला समिती व चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संस्थापक अँड. एन.एन. सिंग, आर. के. सिग यांच्या मार्गदर्शनाखाली रामलीला व रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले. माजी महापौर बापू घडमोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडिया, उद्योजक शशिकांत ढमढेरे, अर्जुन आदमाने, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे आदींची उपस्थिती होती. रावण दहन सुरू होताच जय श्रीराम असा जयघोष व फटाक्याच्या आतिषबाजीने परिसर दणाणून गेला होता. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामलीला समिती व चेरिटेबल ट्रस्टचे अँड. नरशिंग नारायण सिंग, आर के सिंग, उद्योजक नरेंद्रसिंग यादव, राजेश सिंग, जयप्रकाश सिंग, राधेश्याम शर्मा, आर.पी.वर्मा, आलोक सिंग, रंजित सिंग, रामजन्म सिंह, रूद्र प्रतापसिंग, राघवेंद्र सिंग, संजय सिंग, आर.एम.दुबे, अरविंद सिंग, बच्चा सिंग, उपेंद्रसिंग श्रीवास्तव, उदय प्रतापसिंग, आर.पी.सिंग, रामजन्म सिंग, अमोघ प्रजापती, ए.के. सिंग, शैलेंद्र मिश्रा, संदीप मिश्रा, राजेश सिंग( गुड्डू ), ए. बी. सिंग आदींनी परिश्रम घेतले.