
वाळूजमहानगर, (ता.31)- माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने बजाजनगर येथे गणगौर सण साजरा करून गुढीपाडव्या निमित्त शिवपार्वतीच्या वेशात व महिलांनी डोक्यावर मंगलकळस घेऊन रविवारी (ता.30) रोजी सायंकाळी सवाद्य शोभायात्रा काढली.
बजाजनगर येथील माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने गणगोर उत्सव हा मोठ्या उत्साहात व हर्षऊल्लासात साजरा झाला. शिव पार्वतीच्या पूजनाने हा सण साजरा करण्यात आला. हा सण राजस्थानी संस्कृतीमध्ये प्रमुख मानला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून प्रारंभ होऊन 16 दिवस हा सण चालतो. सुख, सौभाग्य प्राप्तीसाठी विवाहित महिला तर सुयोग्य वर प्राप्तीसाठी कुमारीका हा सण साजरा करतात. या गणगोर निमित्त बजाजनगर येथे भजन अंताक्षरी, जितो दिल विथ इंस्टा रील व इतर छोट्याछोट्या खेळांच देखील आयोजन करण्यात आले होते. तसेच गुढीपाडव्या निमित्त ढोल ताशांच्या गजरात गणपती मंदिर या ठिकाणाहून शोभायात्रा काढण्यात आली. या 16 दिवस चालणाऱ्या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजया काबरा, उमा भन्साळी, शितल मोदानी, रचना मालपाणी, सुवर्णा मुंदडा, प्रमिला दरक, विद्या सारडा, मनीषा हेडा, कल्पना सोनी, शीला मिनियार, स्वाती तोतला, शिला राठी, पूनम राठी व रूपा राठी आदींनी परिक्ष परिश्रम घेतले.
