March 26, 2026

वाळुज महानगर, (ता.11) – प्रत्यक्ष डिजिटल खेळाचा आनंद घेता यावा. यासाठी बजाजनगर येथे 14 मे पासून सुरू करण्यात आलेल्या महेश ‘प्ले’ झोन अँड न्यु क्रिस्पी कल्चरला लहान थोरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बजाजनगर येथील कोलगेट चौकातील शॉप नंबर एफ 3/4 प्लॉट नंबर एक्स 124, हॉटेल वृंदावनजवळ महेश ‘प्ले’ झोन सुरू करण्यात आले आहे. 

 

या प्ले झोनचे उद्घाटन जुगलकिशोर काबरा’ संतोष लड्डा व हनुमान भोंडवे यांच्या हस्ते 14 मे रोजी करण्यात आले. या प्ले झोन मध्ये क्युट कॅट, फिश शूटर, व्ही आर गेम, फिश कॅचेर, फ्रॉग जम्प, बाईक राईड, गण घोस्ट, कार रायडर आदि अनेक मनमोहक व आकर्षक डिजिटल गेम येथे आहेत. जे की फक्त मोबाईल मध्येच खेळल्या जात होते. आता इवल्याशा मोबाईल मध्ये डोळे फोडण्याची गरज नाही. त्याचा आनंद प्रत्यक्ष मिळत आहे. अनुभवल्या जात आहे. या डिजिटल खेळांचा आनंद लहान थोर मंडळी प्रत्येक्ष या गेम मधून घेत आहे. बजाजनगर येथे पहिल्यांदाच हा उपक्रमास सुरु करण्यात आला असून त्याला सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *