March 25, 2026


वाळूजमहानगर, (ता.21) – जैन धर्मियांचे 24 वे तीर्थंकर संपूर्ण जगाला अहिंसा, दया, क्षमा, शांती आणि मैत्रीचा संदेश देणारे भगवान महावीर यांच्या 2623 व्या जयंती निमित्त बजाजनगर येथे मिरवणूक, झेंडावंदन, दुचाकी रॅली, रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महाप्रसाद आदी विविध कार्यक्रम घेऊन रविवारी (ता.21) रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रथम सकल जैन समाजाचे अध्यक्ष अनिल चोरडिया यांच्या नेतृत्वात सकल जैन समाजातर्फे भव्य मिरवणुक करण्यात आली. या मिरवणुकीत भगवान महावीर स्वामींच्या जीवनावर आधारित सचिव, निर्जीव देखावे सादर करण्यात आले. मिरवणुकीत श्रीवर्धमान श्वेतांबर स्थानकवाशी, जैन श्रावक संघ, खंडेलवाल दिगंबर पंचायत, शेतवाल दिगंबर पंचायत यांनी सहभाग नोंदवला. मिरवणूक जैन स्थानक बजाजनगर येथे पोहोचल्यानंतर
झेंडावंदन करण्यात आले. त्यानंतर आनंद भक्ती बहु मंडळ, जैन सोशल बहु मंडळ, नवकार महिला मंडळ, त्रिशाला महिला मंडळ व पाठशाळेच्या मुलांचे महावीर स्वामींच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यावेळी महावीर चौक पंढरपूर ते महावीर चौक छत्रपती संभाजीनगर व महावीर चौक ते रांजणगाव (शेणपुंजी) अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. याप्रसंगी श्री वर्धमान शेतांबर स्थानकवाशी, जैन श्रावक संघ व अमृता ब्लड बँक व महाराष्ट्र ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान महावीर स्वामी जयंती निमित्त जैन स्थानक पंढरपूर येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रावक संघाचे अध्यक्ष संतोष चोरडिया, उपाध्यक्ष किशोर राका, सचिव चंद्रकांत चोरडिया, महावीर जन्म कल्याण समितीचे अध्यक्ष वृषभ राका, साहिल मंडलेचा, आनंद गुगळे, यश भाळगटिया, तेजस पोखरणा, सागर चोरडिया, किरण नहार, चेतन छाजेड, रोहित सिंगी, सुमित चोरडिया, खंडेलवाल दिगंबर पंचायतचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र काला, सचिव सुजित गोधा, मनोज कासलीवाल, कुशल पाटणी, जीवन गंगवाल, शेतवाल दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष कुमार नवले, सचिव पवल पाटील, राजेंद्र आवघरे, दिलीप डेरे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाची सांगता भंडारा (गौतम प्रसाद) कार्यक्रमाने झाली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *