वाळूजमहानगर (ता.22) – प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख पारसचंद साखला यांच्या वतीने दिव्यांग मतदारासाठी विशेष शिबिर मोठ्या उत्साहात शुक्रवारी (ता.18) रोजी बजाजनगर येथे झाले. या शिबिरात नवीन मतदार नाव नोंदणी व नावात बदल यासाठी मोठ्या संख्येने फॉर्म भरण्यात येऊन नोंदणी करण्यात आली.
बजाजनगर येथील ऑफिस समोरील मैदानामध्ये झालेल्या या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन औरंगाबाद जिल्हा संपर्कप्रमुख पारसचंद साकला होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार खटावकर मॅडम, नायब तहसीलदार वक्ते मॅडम, नायब तहसीलदार राजमाने, तसेच विभागीय अधिकारी वाघ, मतदार नोंदणी अधिकारी शरद ठाकूर, विजय पाटील, शेकापुरे यांची उपस्थिती होती.
या विशेष शिबिरात अनेक महिला, पुरुष दिव्यांगांनी नवीन मतदान नोंदणी फॉर्म भरून दिले. तसेच नावामध्ये दुरुस्ती व इतर अडचणी दुरुस्त करून घेण्यासाठीही फॉर्म भरून दिले. यावेळी श्री राजमाने यांनी नवीन राशन कार्डबद्दल व अंतोदय राशन कार्डबद्दल माहिती दिली. तसेच जे कोणी दिव्यांग कार्यक्रमास येऊ शकली नाही. त्यांची मतदान यादी मध्ये नाव नोंदवायचे आहेत किंवा दुरुस्त करायचे आहेत त्यांनी पारसचंद साखला, जोतीराम जाधव, शिवाजी दांगटराजे यांच्याशी संपर्क साधावा. असे सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजक प्रहार दिव्याग क्रांती आंदोलन औरंगाबाद जिल्हा सचिव तसेच बजाजनगर राशन दुकानदार जोतीराम जाधव यांनी केले. या कार्यक्रमास उपस्थित प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन औरंगाबाद पश्चिम तालुका महिला अध्यक्ष सुनीता जाधव, प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन वाळुज महानगर अध्यक्ष शिवाजी दांगटराजे, प्रहार दिव्याग क्रांती आंदोलन औरंगाबाद पश्चिम तालुका उपाध्यक्ष किशोर फेगडे, लक्ष्मण धडेकर, बाबुराव फटाले, सोपान ढसाळ, ज्योती कदम, सरोजा भोसले, रंजना सिंग, मनिकलाल चोरडिया, गणेश आहेर, जयस्वाल तसेच वडगाव (को.), बजाजनगर, वाळुज महानगर येथील मोठ्या संख्येने दिव्यांग उपस्थित होते.