
वाळुजमहानगर, (ता.6)- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त वाळूज महानगर पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी (ता.6) जानेवारी रोजी बजाजनगर येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. 
यावेळी मान्यवरांच्या हस्ते वाळूज महानगर पत्रकार संघाच्या नियोजित जागेत वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे बजाजनगर- वडगाव (को.) चे माजी जिल्हा परिषद सदस्य अनीलभैया चोरडिया, घाणेगावचे माजी सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्य शामराव बनसोडे, पंचायत समिती सदस्य सतीश पाटील, 
बजाजनगर येथील सामजिक कार्यकर्ते तथा जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन, दिल्लीचे मराठवाडा अध्यक्ष अर्जुनराव आदमाने पाटील, उद्योजक गजानन नांदुरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विठ्ठल कांबळे, दादासाहेब खडसे पाटील, आशिष पावडे आदी भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह वाळूज महानगरातील सर्व पत्रकारांसह आजी, माजी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
