
वाळूज महानगर, (ता.8) – बजाजनगर येथील संत रविदास महाराज मंदिर परिसरात चर्मकार समाजाचा उपवर वधू-वरांचा भव्य राज्यस्तरीय परिचय मेळावा रविवारी (ता.7) मोठ्या उत्साहात झाला. यावेळी जवळपास 100 हून अधिक उपवर वधु-वरांचे बायोडाटा भरून पालकांनी जोरदार प्रतिसाद दिला. 
संत शिरोमणी गुरू रविदास महाराज बहुउद्देशीय संस्था व आदर्श महिला सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त बालाजी सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्याचे अध्यक्ष उत्तम वझळे तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक गजानन नांदूरकर, प्रा. गोविंद ढगे, अशोक लोहकरे, अमोल लोहकरे, सोपान सातपुते, पोलीस उपनिरीक्षक राजेश वाघ आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात चर्मकार समाजाजतर्फे प्रथमच राज्यस्तरीय मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात वधू-वरांच्या नावनोंदणीसाठी कुठलेही शुल्क आकारणी करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे मेळाव्यास वधु-वरांसह पालकांची मोठी गर्दी केली होती. यावेळी 75 हुन अधिक वर मुलांचे तर जवळजवळ 35 मुलींचे बायोडाटा आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर उपस्थिती वधु-वरांनी भरून दिलेल्या परिचयपत्र वाचून दाखविण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्वांचे परिचय वाचण्यासाठी खुले करण्यात आले होते. 
दरम्यान, या मेळाव्यासाठी आदर्श महिला सेवाभावी संस्था दिनकरराव वाघमारे, प्रल्हाद माने, सदाशिव वाघमारे, श्रीकृष्ण अंबाळकर, विष्णुपंत पद्मने, सुरेश गावळे, रघुनाथ पद्मने, सोपन वाडे, दत्ता राजगुरू, गोंविद वाघमारे, विठ्ठल सातपुते, पदमाकर हुलमुखे, महादेव ढोके, शंकर उसरे, राजेंद्र उसरे, आत्माराम हिरे, अक्षय गाडेकर, सुभाष उसरे, पंकज खंडारे आदींनी परिश्रम घेतले. या वधू वर परिचय मेळाव्यात प्रसिद्धी प्रमुख म्हणून देविदास त्रिंबके यांनी काम पाहिले. मेळाव्याचे सुत्र संचालन गुरू रवीदास महाराज मंदिर संस्थाचे सचीव जितेंद्र आंबेकर यांनी केले. तर पंकज खंडारे यांनी आभार मानले. शेवटी भोजनाने मिळाव्याची सांगता झाली.
