February 5, 2026

वाळूज महानगर – पंचवीस वर्षापासून कार्यरत असलेल्या व महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार मिळविलेल्या बजाजनगर येथील ‘घृष्णेश्वर सहकारी ग्राहक संस्थेची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बजाजनगर येथे नुकतीच मोठ्या उत्साहात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तुकाराम पोतले हे होते. 


बजाजनगर येथील दगडूजीराव देशमुख महाविद्यालयात झालेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केनेकर यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर मसिआ संघटनेचे माजी अध्यक्ष तथा उद्योजक अर्जुन गायकवाड, घृष्णेश्वर सहकारी ग्राहक संस्थेचे सचिव गणेश घुले, व्हाईस चेअरमन विठ्ठल कांबळे, चंद्रकांत पाटील, केशव ढोले, जगदीश अवसरे, डॉ. राहुल कोसंबी, संचालिका वैशाली अवघडे, नलिनी वाघचौरे, संगीता आवटे, राजेंद्र देशमुख, संचालक स्वप्निल माळी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र गीताने व मान्यवरांच्या दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या सत्कारानंतर संस्थेचे व्हाईस चेअरमन विठ्ठल कांबळे यांनी प्रास्ताविक करून या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचा लेखाजोखा मांडला.

             सत्कार करून दिले प्रोत्साहन –
घृष्णेश्वर सहकारी ग्राहक संस्थेच्या या 25 व्या
सर्वसाधारण सभेत दर वर्षाप्रमाणे याही वर्षी संस्थेतून वर्षभर सर्वाधिक खरेदी करणाऱ्यांचा भेटवस्तू, शाल, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले.

तसेच विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा सुद्धा यावेळी प्रमाणपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

 

कार्यक्रमास जिल्हा परिषदच्या माजी सदस्या रेखा नांदुरकर, पंचायत समितीच्या माजी सभापती धनश्री कांबळे, माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण लांडेपाटील, वडगाव को बजाजनगरच्या माजी सरपंच तेजस्विता पंडित, उद्योजक हनुमान भोंडवे, श्रीनिवास कळमकर, शिवाजी राऊत,

दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाचे प्राध्यापक संजय सांभाळकर, क्रीडा शिक्षक डॉ. भरतसिंग सलामपुरे, भाजपाचे ज्येष्ठनेते शत्रुघन देशमुख आदींसह बजाजनगर परिसरातील घृष्णेश्वर सहकार्य ग्राहक संस्थेचे सभासद, संचालक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक पाटील यांनी सूत्रसंचालन केलेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *