वाळूजमहानगर, ता.24- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर व बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे भूमिपुत्र स्व. खाशाबा जाधव यांच्या जन्मशताब्दी निमित्त 14 व 15 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात झाला. या स्पर्धा बजाजनगर येथील इंद्रप्रस्थ जागृत हनुमान मंदिर प्रांगणात 14 व 17 वर्षे आतील मुले व मुली च्या वयोगटात घेण्यात आल्या.
या स्पर्धेच्या बक्षिस वितरण प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, उद्योजक हनुमान भोंडवे, सामाजिक कार्यकर्ते कैलास भोकरे, साईगन इंग्लिश स्कूलच्या संस्थापक अध्यक्ष ज्योती चिलात्रे, इंद्रप्रस्थ जागृत हनुमान ट्रस्ट संचालक जगन्नाथ कोळी, श्री गजानन विद्या मंदिरचे संस्थापक आय. जी. जाधव, क्रीडा अधिकारी गणेश पालवदे, क्रिडा कार्यालयाचे सदानंद सवळे, साईगन इंग्लिश स्कूलच्या राजश्री भराड, संचालक वेल डन कॉमर्स क्लासेसचे गोविंद गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी विविध 18 शाळा, महाविद्यालयातील 52 संघाच्या 624 खेळाडूनी सहभाग घेतला.
या स्पर्धेत मुलांच्या 14 वर्ष वयोगटातील न्यू शहीद भगतसिंग हायस्कूल रांजणगावच्या संघाने प्रथम क्रमांक, पी.एम. ज्ञानमंदिर द्वितीय क्रमांक, सावित्रीबाई फुले इंग्लिश स्कूल राजणगाव तृतीय क्रमांक तर 17 वर्ष आतील मुले या गटात न्यू शहीद भगतसिंग रांजणगाव प्रथम क्रमांक, लिटल एंजल स्कूल बजाजनगर दुतीय क्रमांक, भोंडवे पाटील इंग्लिश स्कूल बजाजनगर तृतीय क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे 14 वर्षे आतील मुलीच्या गटात राजा शिवाजी विद्यालय बजाजनगर प्रथम क्रमांक, शांताई विद्यालय वडगाव दुतीय क्रमांक, राजमाता विद्यालय राजनगाव तृतीय क्रमांक मिळवला. 17 वर्ष आतील मुलींच्या गटात राजा शिवाजी विद्यालय बजाजनगर प्रथम क्रमांक, सावित्रीबाई फुले इंग्लिश स्कूल रांजणगाव द्वितीय क्रमांक, गोदावरी पब्लिक स्कूल वाळूज यांनी तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले.
या स्पर्धामध्ये बेस्ट डिपेडर- करण चव्हाण, अमन रॉय, कु.पल्लवी खंदारे, अक्षरा जाधव, सार्थक घाईट. बेस्ट रेडर – जिवन लांडे, शुभम चव्हाण, कु.अंकिता सुगंध, कृतीका कामठे, अरनव गायकवाड. बेस्ट प्लेअर – जय मोरे, अर्जुन पवार, कु.अंकिता सोनकांबळे, कु.साक्षी कदम, कार्तिक घोडके या खेळाडूची निवड करण्यात येऊन त्यांना आव्हाड देण्यात आले.
या स्पर्धेत पंच म्हणुन सुनिल गोरे, नागेश्वर सावंत, संदिप राठोड, महेश भोवर, प्रशांत भांडे, अतुल चव्हाण, प्रसाद मगर, अजय आहेर, गणेश माकुंडे, सार्थक चिलटे, गौरव पवार यांनी कामगिरी केली.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा.कैलास जाधव, सचिव शेख शमी, कोषाध्यक्ष सी. के.जाधव, समाधान हराळ, प्रा.नारायण शिंदे, दत्ता पवार, रामेश्वर वैद्य, करण लघाने, अण्णा चव्हाण, अनिल शेरे, कृष्णा पवार, ओमप्रकाश वाघमारे, नागेश कदम, धरमशिंग जारवाल, एस. डी. सदावर्ते, कुलभूषण कलावंत, आदिनाथ जाधव यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन प्रा.कैलास जाधव यांनी तर आभार सी.के. जाधव यांनी मानले.