March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.15) – बजाजनगर येथील त्रिमुर्ती शाळेजवळ राहणारी पुजा रविंद्र मिसाळ वय 21, ही मंगळवारी (ता.13) रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास कोणास काहीएक न सांगता राहत्या घरातुन निघुन गेली.

ती परत आली नाही म्हणुन तिचा नातेवाईकांकडे, रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक व परिसरात शोध घेतला. परंतु ती मिळुन आली नाही. याप्रकरणी रविंद्र मोहन मिसाळ (32) रा. बजाजनगर ता. जि. छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पूजा मिसाळ ही हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. रंग- गोरा, उंची-5.5 फुट, चेहरा- गोल, केस लांब, पोषाख लाल रंगाची साडी, भाषा मराठी बोलते. असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याबाबत कोणास काही माहिती मिळून आल्यास तात्काळ पोलिसांची संपर्क साधावा. असे आवाहन वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्यावतीने करण्यात आले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *