वाळूजमहानगर, (ता.29)- – बजाजनगर येथील महादेव मंदिरासमोर उभी केलेली 1 लाख 40 हजार रुपये किमतीची पिकअप बोलेरो रात्रीतून लंपास केली. 22 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आलेल्या या चोरी प्रकरणी शुक्रवारी ता 29 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अशोक शाकिंदर काटकर रा. गट नंबर 161 आलोकनगर बीड बायपास ता.जि. छत्रपती संभाजीनगर हा चालक अजून त्याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. 21 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास महिंद्रा बोलोरो पिकअप ( एम एच 20, ए जी -0172) ही चालक राम अशोक मारोडी रा.बजाजनगर याने महादेव मंदीराचे बाजुला रोडचे कडेला मोकळ्या जागेत उभी करून तो घरी निघुन गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेच्या सुमारास तो तेथे आला असता महिंद्रा बोलोरो पिकअप लंपास केल्याचे उघडकीस आले. 1 लाख 40 हजार रुपये किमतीच्या या बोलोरोचा आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला मात्र ती मिळुन आली नाही. याप्रकरणी काटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
