March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.17)- जयभवानी चौक, बजाजनगर ता.जि. छत्रपती संभजानगर येथील पन्नास वर्षीय इसम कोणास काही एक न सांगता 18 जानेवारीपासून बेपत्ता आहे. त्याच्या पत्नीच्या खबरीवरून तो हरवण्याची नोंद शनिवारी (ता.17) रोजी पोलिसात करण्यात आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजु बाळराज शुक्ला (51) रा. जयभवानी चौक, बजाजनगर.ता.जि. छत्रपती संभाजीनगर हा 18 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेला. त्याचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. या प्रकरणी रुपाली राजु शुक्ल यांनी दिलेल्या खबरीवरून वाळून एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. उंची 5.6 फुट, रंग-सावळा, केस-काळे,(विरळ), चेहरा- लांब, अंगात पांढरा शर्ट व पांढरी पॅन्ट भाषा-हिंदी, मराठी बोलतो, पायात बुट. असे त्याचे वर्णन आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *